फ्लिपकार्टची सुरूवात ऑक्टोबर २००७ मध्ये सचिन आणि बिन्नी यांनी केली होती. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून शिक्षण घेतले आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण फ्लिपकार्ट ही कंपनी १०,००० रूपयांत सुरू झाली होती.
सुरुवातीला त्याचे नाव फ्लिपकार्ट ऑनलाईन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड होते. एवढेच नव्हे तर सुरूवातीला ही कंपनी फक्त पुस्तके विकायचे काम करायची. ही कंपनी सुरू करण्यापूर्वी दोघांनी अॅमेझॉन डॉट कॉमवर काम केले होते.
सचिन आणि बिन्नी सांगतात की दोघांनी फक्त १० हजार रुपये घेऊन आपली कंपनी सुरू केली. जी आज २००० मिलियन डॉलर किंवा १.३२ लाख कोटी रुपयांची कंपनी बनली आहे. सचिन आणि बिन्नीने बंगळुरूमध्ये आपली कंपनी सुरू केली.
या दोघांनी अपार्टमेंटमध्ये 2 बेडरुम असलेला फ्लॅट २-२ लाख रुपयांवर भाड्याने घेतला आणि २ संगणकांसह कंपनी सुरू केली. दरम्यान, कंपनी सुरू झाल्यानंतर १० दिवसांपर्यंत कसलीही विक्री झाली नाही. त्यानंतर, आंध्र प्रदेशातील एका ग्राहकाने प्रथम ऑर्डर बुक केली.
ते पुस्तक होते लिव्हिंग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वर्ल्ड अँड राइटर जॉन वुड. मागील काही वर्षांमध्ये, फ्लिपकार्टने इतकी प्रगती केली आहे की बेंगळुरू येथे कंपनीची अनेक कार्यालये आहेत. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल ही दोन नावे एकून तुम्हाला असे वाटले असेल की हे दोघे भाऊ आहेत.
दोघांची आडनावे एक आहेत परंतु दोघे केवळ व्यवसाय भागीदार आहेत. दोघांमध्ये काही समानता आहेत, जसे की दोघे चंदीगडचे रहिवासी आहेत आणि दोघांनी चंदीगडच्या सेंट एनी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. ते लहानपणीचे मित्र होते.
इतकेच नाही तर दोघांनीही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीमधून एकत्र शिक्षण घेतले आहे. २००५ साली आयआयटी केल्यानंतर सचिन टेकस्पॅन कंपनीत नोकरी करत होते. जिथे त्यांनी फक्त काही महिने काम केले. त्यानंतर त्यांनी अॅमेझॉन येथे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले.
२००७ साली दोघांनीही आपली कंपनी फ्लिपकार्ट सुरू केली. ई-कॉमर्स साइटमध्ये फ्लिपकार्ट गॅझेट्स व इतर उत्पादने यांच्यासह इलेक्ट्रॉनिक, गृह उपकरणे, कपडे, स्वयंपाकघर उपकरणे, वाहन व खेळातील उपकरणे, पुस्तके व माध्यम, दागिनेही विक्री केली जातात.
देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला एका कंपनीने विकत घेतले होते. काही वर्षांपुर्वी अमेरिकन कंपनी वॉलमार्टने तिला विकत घेतले होते. त्यामध्ये वॉलमार्टची ७५ टक्के हिस्सेदारी आहे. वॉलमार्टने १५०० दशलक्ष रुपये म्हणजे एक लाख कोटी रुपयांना खरेदी केले आहे.