आयपीएलचा १४वा हंगाम स्थगित झाल्यानंतर आता क्रिकेट प्रेमींना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे.
टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल साउथहँप्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. ही लढत १८ ते २२ जून या काळात होईल. भारतीय वेळेनुसार पहाटे साडे तीन वाजता ही मॅच सुरू होईल. टेस्ट चॅम्पियनशिपनंतर भारतीय संघ इंग्ंलडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी गांगुली आणि शहा हे दोघे उपस्थित राहू शकतात. याच बरोबर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत आयपीएलच्या १४व्या हंगातील उर्वरीत ३१ लढती इंग्लंडमध्ये आयोजित करण्यासंदर्भातील चर्चा होणार आहे. गांगुली आणि शहा यांच्या भेटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या काही निर्णयांवर देखील इंग्लंड आणि वेल्स बोर्डाशी चर्चा होऊ शकते.
WTC फायनल न्यूझीलंडविरुद्ध- १८ ते २२ जून (वेळ-पहाटे साडे तीन), साउथहँप्टन
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर