दिपेश मोहिते । मुंबई
एखाद्याने नोकरी धरली किंवा एखादा धंद्यात पडला, यातील शाब्दिक भेद सहज लक्षात येणारा नसला तरी महत्त्वाचा आहे. जोखमीच्या व्यवसायापेक्षा नोकरीतील सुरक्षिततेला प्राधान्य देणारी सावध मराठी मानसिकता त्यातून नकळत अधोरेखित होते.
व्यावसायिक यश मिळविण्यासाठी सहनशक्ती, जिद्द, चिकाटी आणि जास्त प्रयत्न करून ग्राहकांना चांगली सेवा देण्याची आवश्यकता असते. आक्रमकता, भांडवलाचा अभाव आणि व्यापार करण्याची मानसिकता नसलेल्या सरळमार्गी मराठी लोकांना त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सुरुवातीला खूपच संघर्ष करावा लागतो.
आज आपण अशाच एका तरुणा बद्दल वाचणार आहोत. त्याचे नाव म्हणजे अमोल परब. अमोल परब याचे कॉलेज शिक्षण पुर्ण झाल्या वर एका जीम मध्ये जिम ट्रेनर म्हणून कामाला त्याने सुरुवात केली. आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला भेटल्या मुळे जसा प्रत्येक व्यक्तीला आंनद होतो तसा त्याला ही झाला आणि थोड्याच वर्षांनी त्याची मॅनेजर म्हणून निवड सुद्धा झाली. परंतू नौकरी मध्ये काय मन रमेना म्हणून त्याने स्वतःची व्यायाम शाळा सुरू करण्याचे ठरवले आणि सात वर्षांपूर्वी म्हणजे दिनांक २१ मार्च २०१५ ला वसई येथे आपली स्वतःची Goal Fitness या नावाने व्यायाम शाळा सुरू केली. २०१५ साली वसई मधील सर्वात मोठी व्यायाम शाळा म्हणून प्रसिद्ध सुद्धा झाली. जश्या प्रत्येक व्यवसायात अडचणी येतात तशा त्याला सुद्धा आल्या तरी त्या परिस्थिती वर मात करून त्याने आपली व्यायाम शाळा सुरू ठेवली. व्यवसाय हे मराठी लोकांच काम नाही अस बोलणार्यांना त्याने चुकीचे ठरवले.
सध्या भारतात व्यायाम करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. भारतात ०.६ टक्के लोक व्यायाम करतात. मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली या ठिकाणी २ टक्के लोक व्यायामशाळेत येतात. दोन ते अडीच टक्के लोक घरी व्यायाम करतात, तर दीड ते दोन टक्के लोक विविध खेळ खेळतात. ९४ टक्के लोक व्यायाम करत नाहीत. हे प्रमाण अतिशय धोकादायक आहे.
ह्याच कारण म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारला की व्यायाम शाळांची फी जास्त असते म्हणुन तर न्हवे?
अमोल परब - तसे म्हणता येणार नाही. कारण तेवढ्या सुविधाही आम्ही देतो. अत्याधुनिक यंत्रसामुग्री, प्रशिक्षित शिक्षकवर्ग याशिवाय आवश्यक त्या इतर सुविधाही दिल्या जातात. व्यक्तपरत्वे वेगळ्या स्वरूपाचा व्यायाम आवश्यक असतो. तो करून घेतला जातो. हे सर्व चालवायचे म्हणजे खर्च येणारच. ज्यांना फीटनेसचे महत्त्व खऱ्या अर्थाने समजले आहे, त्यांना तरी सध्याच्या व्यायामशाळांचे शुल्क जास्त वाटत नाही. सर्वाथाने फीटनेस असलेली पिढी तयार होण्यासाठी अशा अधुनिक व्यायामशाळा आवश्यकता आहे.