Type Here to Get Search Results !

कोरोना आजारा पासुन बरं होण्यासाठी रोज अंडी खाताय? मग हे वाचाच ।।

कोरोना आजारात दररोज अंडी खा असं आवर्जून सांगितलं जात आहे. पण हे नकी खरं आहे का ??

महामुंबई : सध्या अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स आणि औषधांचा तुटवडा जाणवत असून एकूणच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. दुसरीकडे या संसर्गापासून आपला बचाव व्हावा, यासाठी लोक आपल्या आहार विहारामध्ये बदल करताना दिसत आहेत. कोरोना काळात दररोज अंडी खा, आवर्जून सांगितलं जात आहे. त्यात किती तथ्य आहे, किती आणि कशी खायला हवीत अंडी?
या संपूर्ण साथीच्या काळात इम्युनिटी  किंवा प्रतिकारशक्ती हा शब्द सर्वांच्या तोंडी आहे. इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु, अंडी खाताना आपल्याला खूप गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जर अंडी गुणकारी ठरली नाहीत तर त्याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंडी नेमकी किती, कशी खावीत याबाबत जाणून घेऊ या.

अशा प्रकारे करा अंड्याचा आहारात समावेश ।।

जर तुम्ही कोरोनापासून बचाव व्हावा या उद्देशाने अंड्याचे सेवन करु इच्छित असाल तर ते उकडून खावे. तसेच कमी तेलात आम्लेट बनवून किंवा निम्मे शिजवून सेवन केलं तरी चालू शकतं.

एका दिवसात किती अंडी खावीत ;-

ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा ह्दयविकाराचा त्रास आहे त्यांनी फक्त 1 अंड प्रतिदिन सेवन करावं.

अंडी पौष्टीक असतात याचा अर्थ असा नाही बेसुमार अंडी खावीत. एका निरोगी व्यक्तीने 1 दिवसांत 2 ते 3 अंडी खावीत.

मायक्रोवेव्हमध्ये अंडी शिजवू नका ;-

अंडी शिजवण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करु नये. अंडी जास्त वेळ उकळवली किंवा फ्राय केली तर त्यातील अन्टी आक्सिडंट घटक कमी होतात.

या रुग्णांनी खाऊ नये अंड्याचा बलक ;-

एका अंड्यात सुमारे 373 मिग्रा कोलेस्ट्रॉल असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्तीने एका दिवसांत केवळ 300 मिग्रॅ कोलेस्ट्रॉल सेवन करणं योग्य आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.