Type Here to Get Search Results !

का झाली हिंदुस्तानी भाऊ ला अटक?


हिंदुस्तानी भाऊने १२वीच्या परिक्षांसोबतच इतर परिक्षाही रद्द कराव्यात अशी मागणी केली होती. त्यासाठी त्याने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन करणार असल्याची माहिती शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे दिली होती. आज आंदोलनासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कात पोहोचण्यासाठी त्याने रुग्णवाहिकेचा वापर केला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी हिंदुस्तानी भाऊला ताब्यात घेतले आहे.

पोलीस पोहोचण्यापूर्वी हिंदुस्तानी भाऊ छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पोहोचला होता. त्यावेळी त्याने तेथे उपस्थित असलेल्या मीडियासमोर १२वीच्या परिक्षा रद्द करण्याची मागणी केली. तितक्यात पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी हिंदुस्तानी भाऊला ताब्यात घेते.

झोन-५ चे डीसीपी प्रणय अशोक 'द इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना म्हणाले, 'हो, हा एक प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे. तसेच हिंदुस्तानी भाऊने अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचा गैरवापर केला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात एफआयआर नोंदविला जात आहे. त्याला अटक होण्याची देखील शक्यता आहे.'

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.