Mumbai Dabbawala : रोजगार थांबले तरी सत्कर्म थांबले नाही; मुंबईच्या डब्बेवाल्यांनी KEM रुग्णालयाबाहेर जेवणाचं केलं वाटप!
वाढत्या कोरोना विषाणू ला आळा घालण्यासाठी, कडक निर्बंध लागू गेले आहेत, आणि त्याचा फटका रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना बसला तसाच तो मुंबई च्या डब्बेवाल्ल्यांना देखील बसला.
लॉकडाऊन काळात मुंबईच्या डब्बेवाल्यांचा रोजगार बुडूनही, डबेवाल्यांनी माणुसकीचे उत्तम दर्शन घडवून आणले आहे.
मुंबईतील के.ई.एम. (KEM) रुग्णालयाबाहेर डबेवाल्यांनी गरजूंसाठी जेवणाची उत्तम सोया केली आहे. के.ई.एम. (KEM) रुग्णालयात दररोज अनेक रुग्ण दाखल होतात. आणि अशावेळी रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाच्या बाबतीत गैरसोय होते. अनेकदा उपाशी राहावं लागतं. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या डब्बेवाल्यांनी मदतीचा हाथ सरसावत मुंबईतील तीन-चार ठिकाणी जेवण वाटपाचे सत्कार्य हाती घेतले आहे.
मुंबई डबेवाला असोसिएशन चे प्रवक्ते विष्णू काळडोके म्हणाले, "आम्ही वैयक्तिक पातळीवर निधी जमा करून आणि आमच्या ट्रस्टच्या च्या मदतीतून मुंबईतील तीन चार ठिकाणी मोफत जेवण देण्याचं काम हाती घेतलं आहे."