संयुक्त महाराष्ट्राच्या’ लढ्यात मुंबईचा भूमीपुत्र आगरी-कोळी समाजही होता ज्याचे पुरावे मी वरळीच्या बांधवांचे फोटो टाकून समोर आणले होते परंतु त्याचबरोबर या लढ्यात ठाणे-रायगडच्या भूमीपुत्रांचा मोठा सहभाग होता. या लढ्यात भुमीपुत्रांचे लोकनेते दिबा पाटलांचाही लक्षणीय सहभाग आणि पुढाकार होता. संयुक्त महाराष्ट्र सीमा प्रश्नाच्या लढयात बेळगाव येथे जाऊन लोकनेते दि. बा. पाटील, दत्ता पाटील, भाई पाटील (ठाणे) यांनी सुध्दा सत्याग्रह केला होता. त्या वेळी कर्नाटक सरकारने या लढाऊ नेत्यांना ११ महिने तुरुंगात डांबले होते...
मा.दि.बा.पाटीलांनी जामीन घेतला नाही म्हणुन ते व त्यांचे सहकारी वसंतराव पाटील १ व. पेक्षा जास्तकाळ बेळगावचे तुरुंगात होते. बाकी सर्व लवकर सुटून अाले. म्हणुन दि.बा हे प्रत्येक वेळी श्रेष्ठ ठरले. अापल्या भुमीपुत्रांच्या लढाऊ योध्दांचे योगदान विसरुन चालणार नाही आणि विस्मृतीत गेलेला इतिहास आपल्यालाच जगासमोर आणायचाय....
कोण होते दिबा पाटील???? आणि का गेले ३-४ वर्ष भूमिपुत्र नवी मुंबई विमानतळासाठी त्यांच्या नावाची मागणी करीत आहेत....
* देशाला,शेतकऱ्यांना, भूमिपुत्रांना साडेबारा टक्केचा कायदा देणारे.
* कुळकायद्यासाठी कुलाबा जिल्ह्यात पहिला लढा उभारणारे.
* १९८३ चे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते असणारे.
* महाराष्ट्राचे पहिले उत्कृष्ट संसदपटू म्हणुन सन्मान प्राप्त असणारे.
* 'अरे त्या दिबाला आधी पटवुन द्या नाहीतर विधान सभेत कठीण होईल, वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीं असताना ज्यांच्या बद्दल सहज असं विधान करणारे.
* नवी मुंबई आणि नवीन औरंगाबाद वसविताना शेतकर्यांच्या जमिनी मातीमोल भावात खरेदी करु देणार नाही असा महाराष्ट्रातून पहिला आवाज उठवणारे.
* बहुसंख्य महाराष्ट्रातील पुरोगामी कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी उपसुचना करणारे.
*बहूमत असताना देखील त्या उपसुचनांना सरकारला फेटाळण्याची हिंमत झाली नाही असे व्यक्तीमत्व असणारे
*नवी मुंबई घडविण्यात मोठा वाटा असणारे.
भूमिपुत्रांना ‘बाळासाहेबांचा’ आदर आहेच म्हणुन तर आमच्या ‘जीवावर’ तुमचा पक्ष मुंबई,ठाणे,रायगड,नवीमुंबईत मोठा झाला परंतू शेतकऱ्यांचा, भूमिपुत्रांचा,प्रकल्पग्रस्तांचा योध्दा... आणि आमच्या मातीत जन्मलेला ‘शिवबा’ म्हणजे लोकनेते दिबा पाटील ज्यांचा स्वत: बाळासाहेब देखील आदर करत होते. दिबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘ लोकनेते दि.बा पाटील’ नाव देण्यात यावे ही आम्हा साऱ्या भुमीपुत्रांची मागणी गेले कित्येक वर्ष करीत आहोत. पण तुम्हाला कदाचित भुमिपुत्र अन त्यांचं ‘नेतृत्व’ दिसत नसावं म्हणुन ह्या माहितीचा प्रपंच....समजला त ठीक नय त मना ‘आगरीन’ लिवाला लावू नका 🙂
आपलाच स्मार्ट भूमिपुत्र,
सर्वेश रविंद्र तरे
(लेखक,आगरयान)

