इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् लिमिटेड एन्.आर. नारायण मूर्ती आणि नंदन नीलेकणी, एन.एस. राघवन, क्रिस गोपालकृष्णन, एस.डी. सिबुलाल, के. दिनेश व अशोक अरोरा या त्यांच्या सहा सहकार्यांनी पुण्यात जुलै २ १९८१ मध्ये स्थापन केली. राघवन हे कंपनेचे पहिले कर्मचारी होते. मूर्तींनी त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १०,००० रुपये उधार घेतले होते आणि तेच कंपनीचे भांडवल उभारण्याकरता वापरले. कंपनीची नोंदणी "इन्फोसिस कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड" या नावाने करण्यात आली होती. राघवन यांचे माटुंगा, उत्तर-मध्य मुंबई येथील घर हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय होते. २००१ मध्ये 'बिझनेस टुडे' नियतकालिकाने कंपनीला "भारतातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता" (नियुक्तकर्ता) किताब दिला होता.
१९८३ साली कंपनीचे मुख्यालय बंगळूर येथे हलवण्यात आले. तिची भारतात नऊ सॉफ्टवेर विकासकेंद्रे असून जगभरात ३० ठिकाणी कार्यालये आहेत. इन्फोसिसचे अदमासे ८८,६०१ कर्मचारी आहेत (डिसेंबर ३१, इ.स. २००७ रोजी). २००६-२००७ सालात कंपनीचे वार्षिक उत्त्पन्न ३.१ अब्ज आणि बाजारमूल्य ३० अब्ज अमेरिकन डॉलरांपेक्षा जास्त होते.
इन्फोसिस सुरू करताना त्यांच्याकडे कंपनीसाठी स्वत: ची जागा घेण्यासही पैसे नव्हते. सुधा मुर्ती यांची कंपनीच्या स्थापनेत महत्त्वाची भुमिका राहिली आहे.
सुधा यांनी बचत करुन कमावलेले १० हजार रुपये नारायण मुर्ती यांना इन्फोसिससाठी दिले.
६ महिन्यानंतर २ जुलै १९८१ ला कंपनी इन्फोसिस प्रा. लिमिटेड अशी ओळख झाली.