Type Here to Get Search Results !

Tauktae Cyclone Live Update : राज्यात अनेक ठिकाणी चक्रीवादळाचे थैमान

 

Tauktae Cyclone Live Update : Cyclone Demolition in many places in the state


चक्रीवादळामुळे आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असून वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत या पार्श्वभूमिवर  अनेकांचं स्थलांतरही केलं आहे.

त्यामुळे मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबई नजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट व तर, रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे.


- घाटकोपर-विक्रोळी ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. रुळावर झाड पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

- खराब वातावरणामुळे चेन्नई-मुंबई विमान सुरतला वळवले

- चक्रीवादळाच्या धोक्यामुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणं बंद राहणार असल्याची माहिती, स.11 ते दु.2 पर्यंत उड्डाणं बंद राहणार

- रायगडमध्ये चक्रीवादळामुळे पहिला मृत्यू, भिंत कोसळल्याने महिलेचा गेला जीव

- पाचगणी, वाई, महाबळेश्वर परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा फटका, विजेचे खांब, झाडं कोसळल्याने विजपुरवठा खंडित

- रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना, घरांचं नुकसान

- पुढच्या 3 तासांत रायगड, पालघर, मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात 90-100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहरणार असून मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- गडचिरोली जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झालं आहे. 

-मुलचेरा तालुक्यातील मोहूर्ली या गावात म्हशीच्या अंगावर झाड कोसळल्याने म्हैस जागीच ठार झाली आणि शेतकऱ्याच्या घराचे नुकसान झाले.

- नाशिक : शहरात पहाटेपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. वाऱ्याचा वेग ताशी ६ किमीच्या पुढे आहे. किमान तापमानात दोन अंशांनी घट झाली आहे. 

- वसई-विरारमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह, मुसळधार पावसाला सुरूवात

- तौक्ते चक्रीवादळ हे आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकत असून यामुळे वाऱ्याचा वेग आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

- सकाळी २३.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. आर्द्रता ८१ टक्के असल्याने काहीसे धुके तयार झाले आहे.

- मुंबईतल्या अनेक चौपाट्यांवर NDRF ची टीम तैनात

- चक्रीवादळामुळे आज लसीकरण बंद करण्यात आलं आहे.

- पुढच्या ३ तासांमध्ये 75-85 ताशी किमी. वेगाने वारे वाहणार असून पाऊसही मुसळधार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

- साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात, पाचगणी, वाई, महाबळेश्वरला फटका, विजेच्या तारा तुटल्यानं वीजपुरवठा खंडित

- नाशिमध्येही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना

- रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाला फटका बसला आहे. इथं वाकेडला महामार्गावरील मोरी खचल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

- मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत 34 ठिकाणी झाडं कोसळली आहे. पण सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळील समुद्र खवळला, मोठ्या लाटांसह पावसाला सुरवात

- पालघरमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून वाऱ्याचा वेगही जास्त आहे.

- भिवंडीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी पाणी साचलं.

- मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वाशी, पनवेल आणि कळंबोलीतही पावसाची रिमझिम





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.