Type Here to Get Search Results !

लसीकरणासाठी नोंदणी करताय? सावध रहा!!! नाहीतर होऊ शकते फसवणूक, सायबर पोलिसांचे आवाहन!!!!

Register for vaccination? Be careful !!! Otherwise it could lead to fraud , appeals to the cyber police



गेल्या काही दिवसात ऑनलाईन भामट्यांनी फसवणुकीचे नवे प्रयत्न सुरु केले आहेत. शासनाच्या नामसाधर्म्य असलेल्या खोट्या आणि फसव्या लिंक तयार करून हि फसवणून होत आहे. या ठगांनी लसीकरणाच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून फसवणूक सुरु केली आहे. त्यामुळे आता शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. 

लसींच्या तुटवड्यामुळे लस मिळणार कि नाही अशी चिंता अनेक नागरिकांना आहे. आणि सर्वांच्या याच चिंतेचा फायदा घेण्याच्या उद्देशाने हे ऑनलाईन ठग शासनाच्या संकेतस्थळासारख्या दिसणाऱ्या बनावट संकेतस्थळाद्वारे फसवणूक  करत आहेत. या दुष्ट योजनेअंतर्गत ठग नागरिकांना लवकर लस मिळवून देण्याचे अमिश दाखवत आहेत. आणि संदेश द्वारे एक लिंक पाठविण्यात येत आहे.मात्र, अशा कोणत्याही अमिषाला बळी पडू नका असे आवाहन यादव यांनी केले आहे.

संदेशाखालील अनोळखी लिंक उघडल्यास आणि ती डाऊनलोड केल्यास मालवेअर, व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन संवेदनशील माहिती भामटे चोरतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक होऊ शकते , अशी महिती सायबर विभागाने दिली आहे. 

रेमडेसिविरच्या नावाखालीही गंडा -

आम्ही कोरोनावर उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून देऊ, अश्या अमिषाचे संदेश पाठवून ठगण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

यात, रेमडेसिविर उपलब्ध असल्याबाबत सोशल मीडियावर जाहिरात करण्यात येते. जाहिरात बघून सावज जाळ्यात अडकताच त्यांना रेमडेसिविरसाठी ५० टक्के रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांनतर ठग आपल्या संपर्काच्या बाहेर जातात. 

अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरने गुन्हे नोंदविण्यास सुरुवात केली आहे.  योग्य पडताळणी केल्याशिवाय नागरिकांनी कुठेही पैसे पाठवू नका, असे आवाहन त्यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.