Type Here to Get Search Results !

माझं गाव मला हिरवाईने नटलेलं पाह्याचं आहे - रोहित बनसोडे


!! 1 मे , महाराष्ट्र कामगार  दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
         
!!  आमचे आखंडीत  महाश्रमदानाचे चौथे वर्ष चालू  !!

रोहित बनसोडे

    बघता बघता चार वर्षे लोटली . दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करता करता आयुष्यातील आखंडीत महाश्रमदानाचा चौथ्यांदा  महाराष्ट्र दिवस उजाडला ,,

  काळामागून काळ बदलला दिवस वाऱ्यासारखे निघून गेले. पण माझ्या महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आजुनही म्हणावी तशी समाधानकारक बदललेली नाही .
त्यातलीत्यात माझ्या माणदेशातील बिकट दैनिय दुष्काळी परस्थिती पाचवीला पुजलेल्या सटवाईसाखी  पाठ सोडायला तयार नाही,,
 माझ्या माईचं माणगंगेचं पात्र  दिवाळीच्या सनापासुनच कोरडं ठख पडलेलं आसते ,, दूरदूरवर ओसाड  पडलेल्या बोडक्या बकाल डोंगर रांगा ,, काटेरी झुडपांचं कुसळांचं माळरान निचपथ पडून शेवटच्या घटका मोजत प्रतिक्षेत उभं आहे पाऊसाच्या , माझा बळीराजा हावालदिल झालाय ,,  माझी माई  बहिण  या द्रुष्टचक्री प्रकोपाच्या झळा सोसत आहेत ,, कधी पशुधन जगवण्यासाठी परमुलखात स्थलांतरित व्हावे लागत आहे , तर कधी 
पोटाची खळगी भरण्यासाठी परराज्यात स्थलांतरित व्हावे लगत आहे .. 

हि परस्थिती बदलण्यासाठी आम्ही गेल्या चार वर्षांपासून खचुटीने कंबर कसली आहे ,, तेवड्याच ऊर्जेने स्वयंपुर्तिने  धगधगत्या निखाऱ्या प्रमाने मनगटात दहा हात्तीचं बळ आनुन दुष्काळरूपी राक्षसाला मातीत गाढण्याचा प्रयत्न करत आहे , गरजआहे सर्वांनी मिळून दुष्काळा विरुद्ध पाऊल उचलण्याची ....

       माझं गाव मला हिरवाईने नटलेलं पाह्याचं आहे ,,
माझा महाराष्ट्र पाणीदार सुजलाम सुपलाम समरूद्ध झालेला बघायला माझे डोळे आसुसलेले आहेत ..

म्हणून  आजही महाराष्ट्र दिन महाश्रमदान दिवस साजरा करताना पाउलं आपोआपच माळाच्या दिशेने चालू लागतात  ,, घामाच्या धारांनी धरणीमाईला अभिषेक घालण्यासाठी  शेवटचा श्वासही खर्ची करावासा  वाटतो ..  
आमचे प्रत्येक छोटसं पाउल पर्यावरण संरक्षणाच्या दुष्काळ मुक्तीच्या दिशेने 

संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कष्टकरी श्रमकरी  मायबापांना  महाराष्ट्र दिनाच्या  महाश्रमदानदिनाच्या हार्दिक शुभेच्छा , 

रोहित बनसोडे 9503070900 आखंडीत श्रमदानाचे चार वर्षे पूर्ण......

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.