Type Here to Get Search Results !

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!



दिपेश मोहिते। टीम महामुंबई
कोणाची आई, कोणाची मम्मी तर कोणाची मॉम भावना मात्र एकच जिच्या असण्याने घराला घरपण येत अशी आमची आई.आज त्या आई चा दिवस जी वर्षांचे 365 दिवस राबत असते.आई म्हणजे आ- आपल्याला मिळालेलं.  ई- ईश्वराचे रूप.

घरातून बाहेर गेल्यावर जिचे 10 फोन येतात ती असते आई. बाबांच्या ओरडण्या पासून वाचवते ती असते आई. जेव्हा घरी एखादी भाकरी कमी पडली तर ती तिला भूक असून सुध्दा भूक नाही असं सांगणारी ती आईच असते. लेकराला जर काहीही इजा झाली तर तीच हृदय भरून येत. लेकराला स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी फक्त आपली आईच असते. लेकराला मांडीवर झोपवणारी आईच असते. जीवनात दुःखाचे अश्रू पुसणारी सुध्दा आईच असते. आणि लेकराने नाव कमावले तरीही मनभरून कौतुक फक्त आईच करते.

एकदा आई ला म्हटले सुद्धा, तुझ आयुष्य किती छान आहे, नाही तुला टार्गेट चे टेन्शन, नाही तुला बॉस चा ओरडा.आई हसून बोलली तुला कोणी सांगितल मला टार्गेट नसतो,दररोज तुमच्या आवडी निवडिचा नाश्ता बनविणे,तुम्ही सांगितलेली कामे लक्षात ठेवणे हे काय एखाद्या टार्गेट पेक्षा कमी आहे का?आणि बॉस च म्हटलास तर आज भाजी मध्ये मीठ कमी आहे,डाळ चांगली नाही झाली हे जेव्हा तुम्ही सांगत असता तेव्हा तुम्ही माझे बॉसच असता.

खरच किती खरी गोष्ट आहे ना,आपण आपल्या खास मित्र मैत्रीनीना सुद्धा इतक्या सहज पणे सांगत नाही की ती चुकली आहे,किती सावधानतेने त्यांच्याशी बोलतो पण आईच्या मनाचा कधीच विचार करत नाही.
वेळ जाण्याच्या आधी त्या गोष्टींचं महत्व समजून घेणे आवश्यक असते. कारण प्रत्येकाला आईच प्रेम मिळत नाही, आपल्याला आईच प्रेम मिळतंय आपण खूप भाग्यवान आहात. म्हणून आईला कधीही दुखुवू नका आणि तुमच्या जीवनात तिचे किती महत्व आहे हे तिला नेहमी सांगत राहा, कारण आईला लेकरच्या प्रेमाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट पाहिजे नसते.
      
        स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.