दिपेश मोहीतेे। मुंबई
आयपीएलच्या १४व्या हंगामाची सुरूवात ९ एप्रिल रोजी झाली होती. आयपीएल सुरू होण्याआधी काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली होती. पण बायो बबलमध्ये आलेल्या कोणत्याही व्यक्तीला करोना झाला नव्हता. आता स्पर्धा सुरू असताना प्रथमच बायो बबलमधील खेळाडूंना करोना झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.
मला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे मुख्य कार्यकरी अधिकारींकडून मेसज आला आहे. आज होणारी लढत पुढे ढकलण्यात आली आहे. आजच्या सामन्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचीव अनिल पटेल यांनी सांगितले.
आयपीएल सीझन 14 चा हा शेवट आहे का?असा प्रश्न सगळ्याच क्रिकेट प्रेमींच्या मनात उभा राहिला आहे.